Tally.ERP9 (GST Enabled)

बेसिक टॅलि शिका ऑनलाइन ते ही मराठी मधून

महाराष्ट्रात मराठी मधून  100% विडियो असणारा इंग्लिश मधून प्रॅक्टिकलअसणारा कोर्स पहिल्यांदाच
शिका तेही ऑनलाइन घरी बसून फक्त 20 दिवसात

70% DISCOUNT IS A LIMITED PERIOD OFFER RS 999/- ONLY

ACTUAL PRICE RS 3300 DISCOUNT PRICE RS 999

CLICK BELOW FOR LIVE WHATSAPP SUPPORT.
THIS IS A LIMITED PERIOD OFFER. TIME IS RUNNING OUT.HURRY...!
 • 2
  days
 • 6
  hours
 • 30
  mins
 • 22
  secs

CALL OR WHATSAPP -  +91-70209 63767
Further any query please feel free to contact us

मित्रानो आपण आज डिजिटल जगात वावरत आहोत आणि ऑनलाईन कोर्सेसची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो नक्कीच तुमचे अनुभव इतरांसाठी मार्गदर्शक आणि मौल्यवान असू शकतात. आज डिजिटल प्लॅटफॉर्म्स वर सर्व काही उपलब्ध आहे सगळे विषय कोर्स स्वरूपात उपलब्ध आहेत. आणि आता करोनाचा प्रभाव आणि लोकडाऊनमुळे सगळी समीकरनेच बदलून गेली आहेत. शिक्षण हे पूर्णतः ऑनलाईन होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
मंदीमुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे,त्यामुळे अनेक  लोक रोजगाराचे  नवीन पर्याय शोधण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेणार आहेत. हीच संधी आहे तुमचे ज्ञान डिजिटाईझ करून मॉनिटाईझ करण्याची. खास करून व्यापारी वर्ग,कोणत्याहि क्षेत्रातील प्रोफेशनल जसे- सी.ए. डॉक्टर, वकील व्यावसायिक,उद्योजक, या क्षेत्रातील व्यक्ती,कोणत्याही शाखेचा विद्यार्थी अथवा अगदी गृहिणी.....!
सगळ्यांसाठी हि फार मोठी संधी आहे. तर मग या आणि तयार व्हा या ऑनलाईन Tकरण्यासाठी, जॉब मिळवण्यासाठि,work from home साठी करता येईल
GET LIMITED PERIOD OFFER PRICE RS.999/-
माझ्याबद्दल आणि या कोर्स बद्दल.

  मित्रहो, नमस्कार मी विष्णुप्रसाद सारडा VS Infotech चा संस्थापक. अगदी सर्वसाधारण कुटुंबात माझा जन्म झाला. महाविद्यालयात शिकत असताना मला सनदी लेखापाल (CA) होण्याची खूप इच्छा होती. म्हणून मी इ.स. १९९२ ते इ.स. १९९६ दरम्यान एका CA कडे आर्टिकलशिपही केली. मात्र, पुढे काही कारणांमुळे मी CA होऊ शकलो नाही. तो काळ जवळपास ‘ब्लॅक ऍण्ड व्हाईट’चा जमाना म्हणावा असाच होता. आतासारखे स्मार्ट फोन सोडा साधे रंगीत टीव्हीही दुर्मिळ होते. हळूहळू रंगीत टीव्ही घराघरात दिसू लागले आणि नंतर संगणकाचेही आगमन झाले.

  पार्श्वभूमी
  सन १९९६ मध्ये संगणक घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. विशेष म्हणजे संगणक प्रशिक्षणही त्याकाळी प्रचंड महाग होते. अशा सर्व परिस्थितीतच मराठवाड्यातील लातूरसारख्या शहरात Computer Accounting ची संकल्पना आली. संगणक आले, Computer Accounting आलं. मात्र, प्रत्यक्ष अकाऊंटचे आणि संगणकाचे विशेषत: Computer Accounting Software चे ज्ञान असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणं, हे त्याकाळी मोठं आव्हान होतं. अशा सर्व परिस्थितीत आम्ही अत्यंत मेहनतीने कॉम्प्युटर अकाऊंटिंग शिकलो. हे शिकताना सीएकडे आर्टिकलशिप केल्याचा लाभ झाला. आणि आम्ही व्यापाऱ्यांची अकाऊंटिंगची कामे कॉम्प्युटरमध्ये करण्यास सज्ज झालो. संगणक हाताळण्यातील कुशलता, कामातील गती आणि अकाऊंटिंगचा अनुभव या सर्व गोष्टींमुळे आम्हाला व्यापाऱ्यांकडून कॉम्प्युटर अकाऊंटिंगची अनेक कामे मिळाली. प्रत्येक काम आम्ही अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सचोटीने करू लागलो. व्यापाऱ्यांची अकाऊंटिंसच्या नोंदी संगणकात करणे, अकाऊंटिंग अंतिम करणे, आयकर आणि इतर करांसाठीचे आवश्यक ते विवरणे (रिटर्न) भरणे ही सर्व कामे आम्ही करू लागलो. त्यानंतर साधारण २० वर्षे आम्ही लातूरमध्ये अकाऊंटिंगची कामे करत होतो.

  व्हीएस इन्फोटेकची स्थापना
  अकाऊंटिंगची कामे सुरु असताना वाणिज्य शाखेच्या आणि अकाऊंटिंगमध्ये स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना कॉम्प्युटर अकाऊंटिंगबद्दल माहिती व्हावी, त्यांना या क्षेत्रात रोजगार निर्माण व्हावा या हेतूने आम्ही २००८ साली लातूर शहरात व्हीएस इन्फोटेक नावाने इन्स्टिट्युट सुरु केले. त्यासाठी भारतातील अग्रगण्य आणि लोकप्रिय अशा ‘टॅली’च्या टॅली एज्युकेशन प्रा. लि. बंगळुरु यांचे Authorised Education Center आपण लातूरसारख्या शहरात आणले. त्याद्वारे टॅली अकाऊंटिंग सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण सुरु केले. दरम्यान अल्पावधीतच आमच्या प्रशिक्षणाची आणि सेवेची गुणवत्ता लातूर आणि परिसरात पसरली. केवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच नव्हे तर व्यापारी, पुन्हा नव्याने स्वत:चं क्षितीज शोधणाऱ्या गृहिणी यासह अनेकांनी आमच्या इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला. प्रत्येकाला लाभ झाला. शिवाय आमच्याकडे अकाऊंटिंग शिकलेले व्यापारी स्वत:चे अकाऊंटिंग स्वत:च करत आहेत.
  व्हीएस इन्फोटेकची व्याप्ती
  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संगणकीय कौशल्य आत्मसात करावीत यासाठी लातूरमधील लोकप्रिय अशा दयानंद वाणिज्य महाविद्लयाने आमच्यासोबत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना टॅली शिकवण्यासाठी करार केला. ही आमच्यासाठी आनंदाची आणि गौरवाची बाब ठरली. त्यानंतर लातूरमधीलच राजर्षी शाहू महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या पदवी (B.Com.) आणि पदव्युत्तर पदवीच्या (M.Com.) विद्यार्थ्यांना टॅली शिकविण्याचा करार केला. नंतर व्हीएस इन्फोटेकची लातूर जिल्ह्यातील मुरुड याठिकाणी स्वतंत्र शाखा सुरु केले. हे सर्व करत असताना व्यावसायिक भरभराटीसोबतच आम्ही अप्रत्यक्षपणे दर्जेदार प्रशिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक सेवा करत असल्याची भावना आम्हाला अधिक समाधानकारक वाटते.

  विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्याचा प्रयत्न
  प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्यांच्या अकाऊंटिंगच्या छोट्या-मोठ्या संकल्पना दूर करणे, त्यांना संगणकीय प्रणाली आणि अकाऊंटिंग याबद्दल सविस्तर माहिती देणे, प्रक्रिया पद्धती समजावून सांगणे, वर्तमान प्रवाह अशा अनेक बाबींबद्दल इत्यंभूत माहिती देऊन आम्ही आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सुयोग्य प्रशिक्षण देत निष्णात करण्याचा प्रयत्न केला. आमचे अनेक विद्यार्थी आज अकाऊंटिंग क्षेत्रात समर्थपणे कार्यरत आहेत. व्यवसाय करत असतानाही सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन आम्ही आमच्या अनेक गरजवंत विद्यार्थ्यांना विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे टॅली सारखी अग्रगण्य कंपनीही व्हीएस इन्फोटेकमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी वेळोवेळी सहाय्य करत असते. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञान, कुशलता आणि रोजगाराने परिपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

  टॅली सेल्स ऍण्ड सर्व्हिस सेंटर
  कॉम्प्युटर अकाऊंटिंगचे प्रशिक्षण देत असतानाच लातूर आणि परिसरातील अनेक व्यापारी, व्यावसायिक तसेच छोटे-मोठे उद्योजक आणि सीए यांना अकाऊंटिंग सॉफ्टवेअर गरज भासत असल्याचे आम्हाला जाणवले. या गरजेतून आम्ही लातूरमध्येच अधिकृत अकाऊंटिंग सॉफ्टवेअर्स उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टॅली या अग्रगण्य अकाऊंटिंग सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकृत विक्री आणि सेवा  भागीदार (सेल्स ऍण्ड सर्व्हिस पार्टनर) झालो. टॅलीचे संपूर्ण भारतभर विक्री आणि सेवा देणाऱ्या पार्टनर्सचे मोठे जाळे आहे. या गुणवत्तापूर्ण आणि लोकप्रिय कंपनीचे अधिकृत वितरक असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
  स्थित्यंतराचा स्वीकार
  सन २०२० हे वर्ष समस्त मानवजातीवर कोरोनारुपी महासंकट घेऊन अवतरले. इतर कोणत्याही बाबींपेक्षा आरोग्याची सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याने सर्वांनी आवश्यक ती काळजी घेतली आणि घेत आहेत. यातून ऑनलाईन शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण वाढले. अनेक स्थित्यंतरे अनुभवलेले व्हीएस इन्फोटेक शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या ऑफलाईन ते ऑनलाईन स्थित्यंतराचे साक्षीदार होत आहे. या नव्या युगाला, नव्या शिक्षणपद्धतीला आम्ही आनंदाने आणि सर्वतोपरी तयारीने स्वीकारत आहोत. काळाची गरज ओळखून आम्ही ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक ते अधिकृत तांत्रिक प्रशिक्षण घेतले. आम्ही स्वत: ऑनलाईनची अनुभूती घेतली. त्यातील फायदे तोटे शोधले. त्यातील त्रुटींवर मात करून व्हीएस इन्फोटेकद्वारे अत्याधुनिक साधनांचा वापर करून अधिकाधिक दर्जेदार प्रशिक्षण देता येईल यावर विचार केला. लाईव्ह क्लास, झूम, सिस्को इत्यादी सर्व साधनांचा तसेच ऑनलाईन लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास आदी पद्धतीही समजावून घेतल्या. त्यासाठी लागणाऱ्या सुरक्षिततेची सर्व परिमाणे वगैरे आम्ही जाणून घेतले. लातूरसारख्या ठिकाणी नेटवर्कची समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या सवडीनुसार तसेच नेटवर्कच्या उपलब्धतेनुसार आमचे प्रशिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी रेकॉर्डेड कोर्स, ईमेलद्वारे पाठविण्याचा पर्यायही स्वीकारला. शिवाय लॉकडाऊनच्या काळात अर्थकारणाचे चक्र थांबलेले असताना विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन कमीत कमी शुल्क निश्चित केले. रात्रंदिवस प्रचंड परिश्रमाने आम्ही कॉम्प्युटर अकाऊंटिंग प्रशिक्षण क्षेत्रात होत असलेले स्थित्यंतरासाठी अर्थात ऑनलाईन शिक्षणासाठी सज्ज झालो आहोत. त्यासाठी आम्ही आजपर्यंतच्या २५+ वर्षांच्या अनुभवाचा उपयोग केला.

  परिपूर्ण ऑनलाईन कोर्सेसची निर्मिती
  मित्र-मैत्रिणींनो, आम्ही आमच्या अनुभवाचा वापर करून तयार केलेले नवे ऑनलाईन कोर्सेस तुम्हाला नक्कीच खूप उपयुक्त ठरतील अशी मला आशा आहे. विशेष म्हणजे प्रत्येक कोर्ससोबत भरपूर प्रॅक्टिकल्सही आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी टैली सॉफ्टवेअर (शैक्षणिक आवृत्ती) विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही प्रचंड आत्मियतेने शिकवत असतो. प्रत्येकाची वैयक्तिक अडचण दूर करत असतो. ऑनलाईन कोर्समध्येही हीच कार्यपद्धती आम्ही सुरु ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी व्हीएस इन्फोटेकने स्वतंत्र सपोर्ट टीम तयार केली आहे. तुम्ही घरात बसूनच तुमच्या व्हॉटसऍप, फेसबुक व्हीआयपी ग्रुप तसेच टेलिग्राम ग्रुपद्वारे समस्या मांडू शकता. किंवा अगदी व्हॉटसऍपद्वारे (क्रमांक : 9284673393, 7775848312, 9422071348) तुमच्या शैक्षणिक समस्यांचे, शंकांचे निरसन करून घेऊ शकता.
  चला, तर मग नव्या युगासाठी सज्ज होऊयात व्हीएस इन्फोटेकसोबतचा ऑनलाईन कोर्स करूयात आणि नव्या तंत्रयुगाला समर्थपणे सामोरे जावूयात.
  आम्ही सर्व त्या अत्याधुनिक सोशल मिडिया माध्यमांवर उपलब्ध झालो आहोत. ताज्या अपडेटस तसेच महत्वपूर्ण माहितीसाठी आम्ही आपणाला विनंती करतो की आपण आमच्या फेसबुक पेजला लाईक करावे, इन्स्टाग्रामला फॉलो करावे आणि यूट्यूब चॅनेलला Subscribe करावे.

  धन्यवाद!    

  Topics covered
  Maintaining Chart of Accounts in Tally.ERP9

  1. Introduction
  2. Company Creation
  3. Company Features and Configuration
  4. Chart of Accounts
  5. Ledger Creation
  6. Group Creation
  7. Displaying Groups and Ledgers
  8. Deletion of Groups and Ledgers
  9. Practical Assignments of Creation of Ledger Group
  10. Practical Assignments of Creation of Ledgers 

  Maintaining Stock Keeping Units (SKU)      

  1. Introduction
  2. Inventory Masters in Tally.ERP9
  3. Creating Inventory Masters Reports
  4. Practical Assignments

  Recording Day to Day Transactions in Tally.ERP9

  1. Introduction
  2. Business Transactions
  3. Accounting Vouchers
  4. Practical Assignments

  Accounts Receivable and Payable Management

  1. Introduction
  2. Maintaining Bill Wise Details
  3. Activation of Maintain Bill wise Details Feature
  4. New Reference
  5. Against Reference
  6. On Account
  7. Practical Assignments

  MIS Reports

  1. Introduction
  2. Advantages of MIS
  3. MIS Reports in Tally.ERP9
  4. Practical Assignments

  Getting Started With GST

  1. Introduction
  2. Enabling GST and Defining Tax Details
  3. Intra State Supply- Inward & Outward
  4. Interstate Supply- Inward & Outward
  5. GST Reports- GSTR1, GSTR2, GSTR3B
  6. Practical Assignments

  Multi Currency in Tally.ERP9

  1.  Create and Maintain Multi Currencies
  2. Record Transactions with Multi Currencies

  Multi Lingual

  1. Concurrent Multi Lingual Support
  2. Recording Trn ansactioin Multi Lingual

  Security Control in Tally.ERP9

  • Use of security Control Features, to secure financial Data
  • Create and Alter Security Levels In Tally.ERP9

  Getting Started With TDS

  • Basic Concepts of TDS
  • TDS in Tally.ERP9
  • TDS Reports

  Terms and Condition

  Total Length of Videos : 16.00 Hrs
  • Total Practicals and E Books – PDF Format downloadable
  • Expiry : 3 Months or 90 Hours
  • Videos are meant for web viewing only and cannot be downloaded. Videos are available in Full screen viewing.
  • Course/Subject purchased once cannot be cancelled.
  • Certificate will issued by V S Infotech after course completed.
  Copyright 2020 | WWW.VSINFOTECH.NET | All rights reserved

  Social Media